नाताळाची नवी क्रेझ- बिअर्ड लाईट

beard
जगभरात डिसेंबर महिना सुरु झाला कि वेध लागतात नाताळचे. मोठ्या उत्साहात हा सण सर्वत्र साजरा केला हतो. दिवाळी प्रमाणेच या सणाला दिव्याची रोषणाई केली जाते. घरे, शहरे दीपमालानी झगमगु लागतात. सध्या नाताळ साठी पुरुष वर्गात नवीन ट्रेंड आला असून पुरुषवर्ग दाढी मध्ये विजेचे दिवे लावून चेहऱ्याची सजावट करत आहेत. हे दिवे ऑनलाईन खरेदी करता येत आहेत.

या दिव्यामुळे शॉक बसण्याचा धोका नाही कारण ते बॅटरीवर चालतात. दाढीत ते खोचून दाढी ख्रिसमस ट्री सारखी सजविता येते. सोशल मिडीयावर अश्या प्रकारे दाढी सजविलेली लोकांचे फोटो व्हायरल झाले असून हॅशटॅग बिअर्ड लाईटचा वापर करून हे फोटो शेअर केले जात आहेत. या दिव्यात अनेक प्रकार आहेत. काही वायरसह आहेत तर काही वायरलेस आहेत. तसेच अनेक रंगात ते उपलब्ध आहेत.

Leave a Comment