अरेच्चा ! दरवर्षी बनणाऱ्या या हॉटेलचे 5 महिन्यानंतर होते नदीत रुपांतर

(Source)

जगात अनेक लग्झरी हॉटेल्स आहेत. आपल्या खास वैशिष्ट्यांसाठी ही हॉटेल्स ओळखली जातात. मात्र तुम्हाला अशा हॉटेलबद्दल ऐकले आहे का जे दरवर्षी बनते व नंतर त्याचे पाण्यात विसर्जन केले जाते ?

(Source)

स्वीडनमध्ये असे एक आइस हॉटेल आहे. जे दरवर्षी हिवाळ्यात बनवण्यात येते व 5 महिन्यानंतर त्याचे नदीत रुपांतर होते. 1989 मध्ये सर्वात प्रथम हे हॉटेल बनवण्यात आले होते. यावर्षी या हॉटेलला 30 वर्ष पुर्ण झाली आहेत.

(Source)

30 वर्षानिमित्त हॉटेलचे संस्थापक यंगवे बर्गक्विस्ट यांनी स्पेशल सुइट (खोल्या) बनवले आहेत. हे सुइट 16 देशातील 33 कलाकारांनी एका आठवड्यात तयार केले जाते.

(Source)

येथे 12 बेडरूम, आइस बार बनवण्यात आले आहे. यंगवे सांगतात की, हॉटेल आर्कटिक सर्कलपासून 200 किमी लांब टॉर्न नदीवर बनवण्यात आले आहे. येथील तापमान 18 ते 40 डिग्रीपर्यंत असते. येथे दरवर्षी 70 हजार लोक सुट्यांमध्ये येतात. हॉटेलमध्ये बर्फाचे 1000 ब्लॉक्स आहेत. प्रत्येक ब्लॉकचे वजन जवळपास अडीच टन आहे.

 

Leave a Comment