पीसीबी प्रमुख म्हणतात, क्रिकेट भारतापेक्षा पाकिस्तानात अधिक सुरक्षित


नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये तब्बल १० वर्षांनंतर कसोटी क्रिकेट मालिका खेळवण्यात आली. पाकिस्तानने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेवर १-० ने मात करत मालिका जिंकली. पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी कसोटी मालिकेचे सुरक्षितपणे आयोजन केल्यानंतर सुरक्षेच्या मुद्द्यावर अकलेचे तारे तोडले आहेत.

आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तान हे सुरक्षित असल्याचे आम्ही सिद्ध केले आहे. पाकिस्तानात येण्यास जर कोणी उत्सूक नसेल तर आम्हाला त्यांनी सिद्ध करुन दाखवावे. सध्याच्या घडीला पाकिस्तानात क्रिकेट भारतापेक्षा अधिक सुरक्षित आहे. भारतात CAB वरुन होत असलेल्या हिंसाचाराचा संदर्भ घेऊन बीसीसीआयला देखील मणी यांनी टोला लगावला आहे. मणी पाक क्रिकेट बोर्डाच्या संकेतस्थळाला मुलाखत देताना बोलत होते.

कसोटी क्रिकेटच्या दृष्टीकोनातून पाकिस्तानात हा महत्वाचा मुद्दा असून पाकिस्तानातील सुरक्षाव्यवस्थेवर श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेनंतर कोणीही प्रश्नचिन्ह करु शकत नसल्याचे म्हणत मणींनी पाक क्रिकेट बोर्डाची बाजू मांडली. श्रीलंका दौऱ्यानंतर पाकिस्तान बांगलादेशच्या संघाने पाकचा दौरा करावा यासाठी प्रयत्नशील आहे.

Leave a Comment