अशा ओळखा ब्रँडेड आणि बनावटी वस्तू

 

(Source)

आजकाल ब्रँडेड कंपन्यांशी मिळते-जुळते बनावटी उत्पादन सहज बाजारात मिळते. या वस्तू ब्रँडेड आहेत की बनावटी हे पहिल्यांदा पाहिल्यावर लक्षात येत नाही. मात्र व्यस्थितरित्या पाहिल्यास तुम्ही खऱ्या व बनावटीमधील फरक ओळखू शकता.

बनावट वस्तू बनवणाऱ्या अनेक कंपन्या ब्रँडेड कंपन्यांच्या नावाची स्पेलिंग चुकीची लिहितात. ग्राहक मिळते-जुळते नाव असल्याने असे प्रोडक्ट खरेदी करतात. बनावट वस्तूंची डिझाईन देखील ब्रँडेड वस्तूंप्रमाणेच असते. त्यामुळे खरेदी करताना विशेष लक्ष देऊन सामान खरेदी करावे.

(Source)

ब्रँडेड कंपन्या आपल्या प्रोडक्टच्या पँकिंगवर कोड्स, सीरियल अथवा मॉडेल नंबर, ट्रेडमार्क आणि पेटेंटची माहिती देतात. बनावट वस्तूंवर या प्रकारची माहिती नसते. तुम्ही ऑनलाईन देखील ही माहिती तपासून पाहू शकता.

बनावटी वस्तूंमध्ये नाव चुकीचे लिहिलेले असते, सोबतच कंपनीचा लोगो, ब्रँड नाव आणि ट्रेडमार्क देखील बदललेले असते. वस्तूला व्यस्थित बघून तुम्ही या गोष्टी तपासू शकता.

(Source)

अनेक कंपन्यांच्या पँकिंगवर पुर्ण पत्ता, ईमेल, फोन नंबर अथवा कॉन्टॅकटची माहिती असते. मात्र बनावटी वस्तूंवर ही माहिती नसते. वस्तूविषयी काही तक्रार असल्यास ती करता येऊ नये म्हणून संपर्क करण्याची माहिती दिली जात नाही. संपर्क करण्याची माहिती नसलेल्या वस्तू खरेदी करू नयेत.

(Source)

ब्रँडेड कंपन्या आपल्या पँकिंगवर खूप पैसे खर्च करतात. जर तुम्हाला पँकिंग खराब वाटले तर ती वस्तू बनावट आहे असे समजा.

(Source)

ब्रँडेड वस्तूंमध्ये जी चमक असते, ती बनावट वस्तूमध्ये नसते. बनावट वस्तूंमध्ये प्रोडक्ट बनवण्यासाठी खराब गोष्टींचा वापर केला जातो. यामध्ये खराब प्लास्टिक, लेदर, स्वस्त काच, खराब गुणवत्तेचे कापड आणि जुन्या इलेक्ट्रिक वस्तूंचा पार्ट्स असू शकतात.

महागड्या वस्तूंना नेहमी अधिकृत केंद्रावरूनच खरेदी करावे. बनावटी कंपन्या अनाधिकृत केंद्राच्या माध्यमातून वस्तू विकतात. त्यामुळे विश्वासार्ह्य जागेवरूनच वस्तू खरेदी कराव्यात.

Leave a Comment