फक्त ‘ठाकरे’ आडनाव असून कोणी ‘ठाकरे’ होऊ शकत नाही


मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी करून जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये फक्त ‘ठाकरे’ आडनाव असून कोणी ‘ठाकरे’ होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.


14 डिसेंबरला सावरकरांच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. अमृता यांनी त्यावर ट्विटला प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात माझे आडनाव गांधी आहे, सावरकर नाही, त्यामुळे मी माफी मागणार नसल्याचे म्हटले होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखे काम करावे लागते. त्यानुसार काम केले तरच माणसे मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अमृता यांनी या ट्विटवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्या ट्विट करून म्हणाल्या, देवेंद्रजी खर आहे, फक्त ‘ठाकरे’ आडनाव असून सुद्धा कोणी ‘ठाकरे’ होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावे लागते.

Leave a Comment