हा व्यक्ती देत आहे मोफत न्यूझीलंड फिरण्याची संधी

(Source)

प्रत्येक व्यक्तीची एकदा तरी परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असते. जर तुमची देखील अशी इच्छा असेल तर तुमचे हे स्वप्न अगदी फ्रीमध्ये पुर्ण होऊ शकते. जर्मनीचा प्रसिद्ध उद्योगपती कार्ल रिपन अशा लोकांच्या शोधात आहे, जे परदेशात फिरायची स्वप्ने बघतात.

रिपनला त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी अशा 10 जणांची गरज आहे, जे न्यूझीलंडमध्ये येऊन त्यांचा एकटेपणा दूर करतील. तुम्हाला केवळ रिपन यांचा चांगला मित्र बनून खूप मस्ती करावी लागेल. त्यांच्या फार्म हाऊसवर जगातील सर्व सुविधा आहेत.

(Source)

रिपन यांचे हे फार्म हाऊस 220 हेक्टरमध्ये पसरलेले आहे. ज्याचे नाव Awakino Estate असे असून, हे फार्म हाऊस त्यांनी वर्ष 2000 मध्ये खरेदी केले होते.

(Source)

रिपन यांना या फार्म हाऊसवर एकटेपणा वाटतो व मित्रांची कमतरता वाटते. यासाठी त्यांनी ही शानदार ऑफर दिली आहे. रिपन यांनी एका एका वृत्तपत्रात याची जाहिरात देखील दिली आहे. जाहिरातीमध्ये लिहिले आहे की, कोणतीही 18 ते 70 वयोगटातील व्यक्ती फार्म हाऊसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येऊ शकते. फार्म हाऊसच्या जवळील नदीत स्विमिंग, फिशिंग, कायाकिंग, बर्ड वॉचिंगसोबतच नदी किनारी सकाळ-संध्याकाळ चालण्याचा अनुभव घेऊ शकता. येथे तुम्हाला अनेक प्रकारचे प्राणी देखील पाहायला मिळतील.

Leave a Comment