8 कोटींची कुत्री शोधणाऱ्याला मिळणार एवढे मोठे बक्षीस

(Source)

कर्नाटकमधील बंगळुरू येथील अलास्कन मलामूट प्रजातीची एक कुत्री सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या कुत्रीच्या मालकाने कुत्री हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. कुत्रीच्या मालकाने सांगितले की, या कुत्रीची किंमत तब्बल 8 कोटी रुपये आहे आणि ही कुत्री शोधून देणाऱ्याला ते 1 लाख रुपये बक्षीस म्हणून देतील.

पोलिसांनी सांगितले की, चेतन एन. या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. चेतन एन. यांनी सागितले की, त्यांनी चीनवरून ही खास प्रजातीची कुत्री खरेदी केली होती. त्यांनी एका करारासह श्रीनगर (दक्षिण बंगळुरू) येथील सौम्या यांना ही कुत्री सोपवली होती व त्यांच्याकडून ती हरवली.

चेतनने सांगितले की, एका करारानुसार कुत्री सौम्या यांना सोपवण्यात आली होती. या अंतर्गत कुत्रीला पिल्लं झाल्यानंतर एक पिल्लू आपल्याजवळ ठेऊन इतर परत करण्यात येणार होती. सौम्या यांच्या कुटूंबाने ही अट मान्य केली होती. या कुत्रीच्या एका पिल्लाची किंमत 2 लाखांपेक्षा अधिक आहे.

Leave a Comment