तुम्हाला माहित आहे का Windows-XP च्या या खास वॉलपेपरची कथा?

(Source)

तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या व्हिंडोज एक्सपीचा डिफॉल्ट वॉलपेपर माहिती असेलच. या वॉलपेपरचा फोटो जगप्रसिद्ध आहे. सुरूवातीला हा फोटो कोठे काढला हे कोणालाच माहिती नव्हते. काहींनी हा फोटो फ्रान्स, स्विझर्लंड, आयर्लंडमधील असल्याचे सांगण्यात आले होते.

हा खास फोटो चार्ल्स नावाच्या एका फोटोग्राफरने काढला आहे. हा फोटो अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील आहे.

(Source)

जानेवारी 1996 ला चार्ल्स आपल्या गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये फिरत होते. अचानक वादळ आल्याने त्यांना रस्त्यात थांबावे लागले. वादळ गेल्यानंतर सोनोमा हायवेवरून जाताना चार्ल्स यांचे लक्ष एका डोंगरावर गेले. ते दृश्य एवढे सुंदर होते की, फोटोग्राफर असलेल्या चार्ल्स यांच्या कॅमेऱ्याने ते हेरले. चार्ल्स यांनी थोड्या थोड्या अंतरावर 4 फोटो काढले.

चार्ल्स त्यावेळी नॅशनल जिओ ग्राफिक चॅनेलला काम करत होते. त्या चॅनेलसाठी हे फोटो काहीही कामाचे नव्हते. त्यानंतर त्यांनी हा फोटो स्टॉक वेबसाईट कार्बिजवर टाकला. येथे पैसे देऊन फोटोचा वापर करता येतो.

(Source)

4-5 वर्षांनंतर चार्ल्स यांना मायक्रोसॉफ्टच्या डेव्हपमेंट टीमकडून कॉल येतो. त्यांना हा फोटो नवीन ऑपरेटिंग सिस्टमच्या वॉलपेपरसाठी हवा होता. त्यांना हा फोटो भाड्यावर नाही तर ओरिजनल नेगेटिव्हसह हवा होतो, जेणेकरून दुसरे कोणेही त्याचा वापर करू शकणार नाही.

(Source)

मायक्रोसॉफ्टने जी किंमत चार्ल्सला ऑफर केली, ती हैराण करणारी होती. आतापर्यंत योग्य किंमतीचा खुलासा झालेला नाही. चार्ल्स यांच्याकडून गोपनीयता करारावर सही करून घेण्यात आली. मायक्रोसॉफ्टने चार्ल्स यांच्यासाठी विमानाचे तिकिट देखील पाठवले व चार्ल्स स्वतः फोटो देण्यासाठी गेले.

हा फोटो कोठे काढला आहे, याची माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी तेथे जाऊन तसाच फोटो काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाच ते शक्य झाले नाही.

 

Leave a Comment