पंगामध्ये रेल्वेची तिकीटे विकणार कंगणा रानावत


आता पंगा या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडची क्विन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे काही पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यातील कंगनाचा लूक तिच्या चाहत्यांच्या बराच पसंतीस उतरला आहे. याचदरम्यान पंगामध्ये कंगना एका रेल्वे कर्मचाऱ्याची भूमिका साकारणार असून जी काऊंटरवर तिकीट विक्री करणार आहे.

नुकत्याच रिलीज केलेल्या नव्या पोस्टरमध्ये कंगना कोणता तरी विचार करत बसलेली दिसत आहे. त्यासोबतच तिच्या नावाची पाटी ठेवली आहे. मागच्या बाजूस बऱ्याच फाईल्स दिसत आहेत. कंगना आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवर तिकीट विक्री करताना दिसत आहे. चित्रपटातील एका सीनसाठी असे पुन्हा करण्यात येईल.


दिग्दर्शक अश्विनी अय्यरचा कंगना अभिनीत पंगा हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामा असणार आहे. यात कंगना राष्ट्रीय स्तरावरील खेळणाऱ्या कबड्डीपटूच्या भूमिकेत दिसेल. तसेच तर पंगामध्ये कंगना पुन्हा एकदा आईंची भूमिका देखील साकारणार आहे. 24 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होईल यात कंगना व्यतिरिक्त जस्सी गिल, नीना गुप्ता, रिचा चड्ढा आणि पंकज त्रिपाठी यांचीही मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पणजी, भोपाळ, दिल्ली आणि कोलकात्तासारख्या लोकेशन्सवर झाली आहे.

या चित्रपटाचे एक पोस्टर दोन दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले होते. त्या पोस्टरमध्ये रिचा चड्ढा दिसली होती. दोघीही एकत्र पायरीवर बसून हसताना दिसल्या. कंगना ब्राऊन रंगाच्या ड्रेसमध्ये आणि गुलाबी रंगाच्या स्वेटर घातलेली दिसली. तर रिचा ब्लू डेनिम आणि रेड ब्लू चेक्स शर्टसोबत जॅकेटमध्ये दिसली. दोघांच्या हातात चहाचा पेला दिसला.

कॉमेडी आणि इंमोशन्सचा टच असलेल्या या चित्रपटात जस्सी गिल हा कंगनाच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. पंगाचा फर्स्ट लूक 7 मार्च 2019 ला रिलीज करण्यात आला होता. ज्यात एक कपल मावळता सूर्य बघताना एकमेकांकडे बघून हसताना दिसले होते. पंगाचे संगीत शंकर-एहसान आणि लॉय यांनी दिले आहे. तर गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत.

Leave a Comment