जगातील सर्वात मोठी लॉटरी, वाटले तब्बल 1728 कोटी रुपये

(Source)

स्पेनमध्ये रविवारी जगातील सर्वात मोठ्या ख्रिसमस लॉटरी ‘एल गार्डो’च्या बक्षीसांची घोषणा करण्यात आली. दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने 22 डिसेंबरला हा कार्यक्रम पार पडतो. देशातील टेलिव्हिजनवर देखील या लॉटरीचे थेट प्रेक्षपण करण्यात आले.

(Source)

लॉटरीद्वारे एकूण 2.43 बिलियन डॉलरचे (1728 कोटी रुपये) पुरस्कार वाटण्यात आले. ही लॉटरी सरकारद्वारे संचालित केली जाते. पहिला पुरस्कार तिकिट नंबर 26590 ला देण्यात आले. त्याला 3 कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली. लॉटरीचा जॅकपॉट ख्रिसमसच्या वेळी उघडला जातो. यामध्ये 00000 ते 84999 पर्यंत लॉटरी नंबर असतात. यामध्ये 3 मुख्य पुरस्कार आणि 1000 पेक्षा अधिक छोटे पुरस्कार असतात.

(Source)

लॉटरीचा ड्रॉ वेगळ्या प्रकारे होतो. यामध्ये कोणत्याही मशीन अथवा तंत्राची मदत घेतली जात नाही. जाळीदार मोठ्या गोळ्यात लाकडाचे छोटे छोटे चेंडू असतात. प्रत्येक चेंडूवर 5 अंकी संख्या असते. ड्रॉची घोषणा शालेय विद्यार्थी करतात.

(Source)

स्पेनची ख्रिसमस लॉटरी 1812 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही जगातील दुसरी सर्वाधिक चालणारी लॉटरी आहे. या लॉटरीच्या एका तिकिटाची किंमत 200 यूरो (15,761 रुपये) आहे.

Leave a Comment