दिशा पटनीच्या बिकिनी लुकवर संतापले नेटकरी


बॉलिवूडमध्ये ‘बागी २’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पटनीने आपल्या अभिनयापेक्षा तिच्या हॉट फोटोमुळेच जास्त चर्चेत असते. त्यातच तिचे नाव टायगर श्रॉफ जोडले गेल्यापासून तिची जास्तच चर्चा होत आहे. इंस्टाग्रामवर आपल्या बिकिनी फोटोमुळे तिच्या फॅनफॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्याचबरोबर सतत काही ना काही आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट करणारी दिशा कायमच चर्चेत असते. पण तिने नुकत्याच केलेल्या एका फोटोमुळे नेटकर कमालीचे संतापले आहेत.

View this post on Instagram

🦋 #MYCALVINS @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


देशभरात अनेक ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध होत आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या विरोध आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. या कायद्याला अनेकांनी विरोध केला आहे. बॉलिवूडमधील काही या कायद्याविरोधात कलाकारही मैदानात उतरले आहेत. तर प्रत्यक्ष आंदोलनात फरहान अख्तरसारखे कलाकार सहभागी झाले तर काहींनी या कायद्याला सोशल नेटवर्किंगवरुन विरोध केला आहे. असे असतानाच दुसरीकडे दिशाने आपला एक बिकिनीमधील फोटो शेअर केला आहे. दिशाने पोस्ट केलेला हा फोटो अनेकांना खटकला आहे. देशामध्ये हिंसक आंदोलन होत असताना दुसरीकडे एखादी अभिनेत्रीने अशी पोस्ट करावी हे संतापजनक असल्याचे मत अनेकांनी दिशाच्या पोस्टवर प्रतिक्रिया करुन म्हटले आहे. गुरुवारी इंस्टाग्रामवर बिकिनीमधील एक फोटो दिशाने पोस्ट केला. अनेकांनी यावर आपला राग व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

💚🧚‍♀️ #MyCalvins @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


एका युझरने ही भाजपची चाल असून सीएबी आणि एनआरसीवरुन तरुणांचे लक्ष्य विचिलीत करण्यासाठी पोस्ट करण्यात आल्याचे म्हटले आहे. तर आणखी एका युझरने एकीकडे देशामधील वातावरण तणावपूर्ण आहे तर दुसरीकडे तू अशा पोस्ट करण्यात व्यस्त असल्याचा टोला दिशाला लगावला आहे. एकंदरीतच नेटकऱ्यांनी देशामध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना दिशाने अशाप्रकारे फोटो पोस्ट करण्याची काहीच गरज नसल्याचे मत नोंदवल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment