इलेक्ट्रिक स्कूटर ‘बेनलिंग ऑरा’ भारतात लाँच

(Source)

चीनची इलेक्ट्रिक दुचाकी निर्माण करणार कंपनी बेनलिंगने भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘ऑरा’ लाँच केली आहे. कंपनीने सांगितले 2020 च्या पहिल्या तिमाहीत स्कूटर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल.

इलेक्ट्रिक स्कूटर ऑराला दिल्लीच्या ईव्ही एक्सपोमध्ये लाँच करण्यात आले. याआधी कंपनीने भारतीय बाजारात लो स्पीड मॉडेल Kriti (कृति), Icon (ऑयकन) आणि Falcon (फालकन) सादर केले आहेत.

(Source)

कंपनीने या स्कूटरमध्ये अनेक खास फीचर दिले आहेत. बेनलिंग ऑरामध्ये ब्रेकडाऊन स्मार्ट असिस्टेंस सिस्टम देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, या फीचरमुळे स्कूटरमध्ये कितीही बिघाड आला तरी देखील स्कूटर सुरूच राहते.

(Source)

स्कूटरमध्ये 2500 BLDC इलेक्ट्रिक मोटर आणि 72V/40Ah डिटॅचेबल लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ऑरा  सिंगल चार्ज वर  120 किमी चालू शकते. डिटॅचेबल बॅटरीला चार्ज करण्यासाठी 4 तास लागतात. स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 60 किलोमीटर आहे.

ऑरा रिमोट की-लेस सिस्टमने सुसज्ज आहे. यात यूएसबी चार्जिंग सिस्टम देण्यात आले आहे. याशिवाय स्कूटरमध्ये एंटी थेफ्ट अलार्म आणि एडिशनल रिअर व्हिल इंटिग्रेटेड लॉकिंग सिस्टम देण्यात आली आहे.

Leave a Comment