… जेव्हा या खेळाडूसाठी ‘देव’ होतो पोलार्ड

(Source)

वेस्ट इंडिज संघातील फलंदाज निकोलस पूरन 4 वर्षांपुर्वी अपघातात दुखापतग्रस्त झाला होता. अपघातानंतर तो 6 महिने चालण्यास देखील असमर्थ होता. अशा परिस्थिती कायरन पोलार्ड त्याच्या मदतीसाठी धावून आला. दुर्घटनेच्या वेळी पूरनचे वय केवळ 20 वर्ष होते. मात्र पोलार्डमुळे पूरन आज वेस्ट इंडिजच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे.

भारता विरुद्धच्या एकदिवसायी मालिकेत त्याने 23 चेंडूत 29 धावा, 47 चेंडूत 75 धावा आणि 64 चेंडूत 89 धावा केल्या. पूरन म्हणाला की, मी पोलार्डचे आभार मानतो. तो माझ्यासाठी मोठा भाऊ, पितृतूल्य आहे. मी क्रिकेटच्या मैदानात परतल्यापासून तो माझ्यासोबत आहे. त्याने मला संधी दिली. यासाठी मी आभारी आहे.

याआधी युनिवर्सल बॉस ख्रिस गेलने देखील पूरनचे कौतूक केले आहे. त्याने विश्वचषकादरम्यान भारताविरुद्धच्या सामन्याआधी म्हटले होते की, निकोलस पूरनची फलंदाजी पहा, तो एक शानदार खेळाडू आहे.

23 वर्षीय निकोलसने भारताविरुद्धच्या मालिकेत 20 चौकार आणि 9 षटकार ठोकले. 19 एकदिवसीय सामन्यात त्याची सरासरी 52 आहे.

पोलार्डबद्दल विचारल्यावर पूरन सांगतो की, मैदानाबाहेरी आमची मैत्री क्रीजवर देखील दिसते. पोलार्डबरोबर शतकीय पारीनंतर तो म्हणाला की, आम्ही एकमेंकाना समजतो. आम्ही मैदानाच्या बाहेर आणि आत देखील चांगले मित्र आहोत. आम्हाला माहिती आहे फलंदाजीच्या वेळेस एकमेंकाना कशी साथ द्यायची. आम्ही परिस्थिती नीट समजून त्यानुसार खेळतो.

 

Leave a Comment