सुपरसिरीज २०२१ भारतात खेळली जाणार-सौरव गांगुली


बीसीसीआयचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली याने टीम इंडिया चार देशांच्या वन डे सिरीज मध्ये खेळेल आणि या स्पर्धा २०२१ मध्ये भारतात होतील असे मिडियाला सांगितले. गांगुली सध्या इंग्लंड मध्ये असून रविवारी मिडियाशी बोलताना त्याने ही माहिती दिली. तो म्हणाला गेल्या २० वर्षात भारत फक्त आयसीसी आणि आशिया कप मध्येच तीनपेक्षा अधिक देशांच्या संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत खेळला आहे. त्यामुळे चार देशांचा सहभाग असलेल्या सुपर सिरीज स्पर्धा सुरु होत असून यात भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या टीम असतील आणि चौथी टीम कोणती असेल त्याची घोषणा लवकरच केली जाईल.

या सुपर सिरीज म्हणजे मिनी वर्ल्ड कपची आवृत्ती असेल असे समजते. भारताने १९९९ मध्ये केनिया, भारत, झिम्बावे आणि द.आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या चार देशांच्या वनडे स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी टीम इंडियाचे नेतृत्व अजय जडेजा यांच्याकडे होते. त्यावेळी अंतिम सामन्यात भारताला द. आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता.

Leave a Comment