माईक टायसन सेरेनाला देतोय बॉक्सिंगचे धडे


कोणत्याही खेळात खेळाडूला त्याच्या फिटनेसबाबत अतिशय जागृत राहावे लागते कारण फिटनेसचा थेट परिणाम त्याच्या करिअरवर होत असतो. त्यातून हे खेळाडू त्याच्या क्षेत्रातील महान असतील तर फिटनेस त्यांच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न बनतो आणि फिट राहावे म्हणून हे खेळाडू जीवतोड मेहनत घेतात. ऑस्ट्रेलियात जानेवारीत होत असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅमचे बिगुल वाजू लागले आहेत, टेनिस सम्राज्ञी आणि २३ ग्रँडस्लॅम विजेती सेरेना विलियम्स यामुळेच फिटनेससाठी झटत आहे. विशेष म्हणजे तिला यावेळी अमेरिकेचा महान मुष्टीयोद्धा माईक टायसन बॉक्सिंगचे धडे देत आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ आणि फोटो माईक टायसन याने त्याच्या इन्स्टाग्राम अकौंटवर शेअर केला आहे.

या फोटोखाली कॅप्शन लिहिताना तो म्हणतो, मी या ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम (गोट) सेरेना बरोबर रिंगमध्ये उतरू इच्छित नाही. टायसनच्या व्हिडीओमध्ये तो सेरेनाला पंचिंग कॉम्बीनेशनचा सराव देताना दिसतो आहे. यामुळे हात आणि डोळे यांचे कोओर्डीनेशन उत्तम साधले जाते. सेरेनाचा कोच पॅट्रिक मोरटोग्लू याने यावर्षी पारंपारिक ट्रेनिंगपेक्षा वेगळ्या पद्धतीने सेरेना आणि १५ वर्षीय कोको गॉफ यांना एकत्र ट्रेनिंग देण्याची योजना आखली असून माईक टायसनकडून बॉक्सिंगचे धडे हा त्याचाच एक भाग आहे. टीम बिल्डिंग कॅप या नावाने हे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात सिनिअर खेळाडूबरोबर युवा खेळाडूनां प्रशिक्षित केले जात आहे.

Leave a Comment