२०० वर्षात प्रथम या चर्चमध्ये नाताळ प्रार्थना नाही


नोत्रे डेम कॅथेड्रल या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील असलेल्या ८५० वर्षे जुन्या चर्च मध्ये यंदा २०० वर्षात प्रथमच नाताळची प्रार्थना होणार नसल्याचे जाहीर केले गेले आहे. फ्रांसच्या पॅरीस मध्ये हे चर्च असून एप्रिल मध्ये ते आगीच्या भक्षस्थानी पडून त्याचे मोठे नुकसान झाले होते.

चर्च प्रवक्ते एन्द्रे फिनोट यांनी रविवारी या संदर्भात बोलताना सांगितले की १८०३ सालानंतर प्रथमच या चर्च मध्ये क्रिसमस मास होणार नाही. एप्रिल मध्ये चर्चला प्रचंड आग लागली होती ती सिगरेट किंवा शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज होता. विशेष म्हणजे दुसरे महायुद्ध झाले तेव्हा या चर्चचा ताबा नाझी सैनिकांकडे होता तेव्हाही येथे क्रिसमस मास झाला होता.

फ्रांसचे राष्ट्रपती मॅक्रो यांनी १३ व्या शतकातील हे चर्च पुढच्या पाच वर्षात होते तसे पुन्हा उभारले जाईल अशी घोषणा यापूर्वीच केली आहे.

Leave a Comment