मिस टिन इंटरनॅशनल स्पर्धेत भारताची आयुषी विजयी


बडोद्याची १६ वर्षीय आयुषी ढोलकिया हिने मिस टिन इंटरनॅशनल २०१९चा खिताब मिळविला असून २७ वर्षानंतर भारतीय मुलीने हा खिताब मिळविला आहे. ही स्पर्धा गुरुग्राम येथे १९ डिसेंबर रोजी पार पडली असून हे जगातील सर्वात जुने टिन पेजेंट (टायटल)आहे. आयुषीने तिच्या इन्स्टाग्राम वर त्याचे फोटो शेअर केले आहेत.

आयुषी ११ वी मध्ये शिकत असून तिने कथक नृत्याचे शिक्षण घेतले आहे. तिला या स्पर्धेत मिस टिन बरोबरच बेस्ट नॅशनल कॉस्चुम व बेस्ट इन स्पीच अॅवॉर्डही मिळाले आहे. या स्पर्धेसाठी २२ देशातून प्रतिनिधी आल्या होत्या. पॅराग्वेची येस्सेनिया ग्रेरीया फर्स्ट रनरअप ठरली तर बोटस्वानाची एनिरीया गाओ सेकंड रनरअप ठरली.

आयुषीला जजने जगात एकाच देश आणि एकच नेता असेल तर जग अधिक चांगले असेल काय असा प्रश्न विचारला होता. तेव्हा तिने वैश्विक सरकार असेल तर जग अधिक चांगले असेलच असे सांगता येणार नाही कारण जगात जे देश आहेत ते भौगोलिक आणि विविध विचारधारा यांच्यामुळे वेगळे आहेत. सर्वच नेते त्यांच्या देशाच्या भल्यासाठी जागरूक आहेत आणि ती भारतीय असल्याने वसुधैव कुटुम्बकमवर विश्वास ठेवते असे सांगितले. ती म्हणाली देश वेगळे असले, सरकारे वेगळी असली तरी आपण सर्व एकच परिवार म्हणून प्रेम, शांतीने राहू शकतो.

Leave a Comment