हा आहे विराटचा सर्वात मोठा चाहता, शरीरावर काढलेत 16 टॅटू

(Source)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत व्यस्त आहे. मात्र सध्या विराटचा एक चाहता चर्चेचा विषय ठरत आहे. विराटच्या एका चाहत्याने त्याच्या प्रती आदर आणि प्रेम दर्शवण्यासाठी स्वतःच्या शरीरावर तब्बल 16 टॅटू बनवले आहेत.

ओडिसाच्या पिंटू बेहेराने विराटच्या सन्मानार्थ 16 टॅटू काढले आहेत. यात विराटचा जर्सी क्रमांक 18 चा देखील समावेश आहे.

पिंटू बेहेराने टॅटूविषयी सांगितले की, मला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे आणि विराटच्या खेळण्याच्या स्टाईलमुळे मी त्याचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे त्याच्या प्रती आदर दाखवण्यासाठी मी असे केले. 2016 ला जेव्हा टॅटू काढण्यास सुरूवात केली, तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणून मी पैसे वाचवण्यास सुरूवात केली व टॅटू काढले.

त्याने शरीरावर 16 कायमस्वरूपी टॅटू काढण्यासाठी 1 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. त्याने सांगितले की, भारतात विराट खेळत असलेले सर्व सामने पाहण्यासाठी मी जात असतो. देशाबाहेरचे सामने बघायला मी जात नाही. मला संधी भेटल्यास मी नक्कीच जाईल.

या लकी चाहत्याची काही दिवसांपुर्वीच विरोट कोहली भेट झाली होती. ऑक्टोंबरमध्ये विशाखापट्टनम येथे दक्षिण आफ्रिका आणि भारतामधील कसोटी सामन्यादरम्यान पिंटूची विराटशी भेट झाली होती.

आपल्या या भेटीविषयी तो सांगतो की, मला वाटलं नव्हतो तो मला भेटेल आणि अलिंगन देईल. तो माझ्यासाठी स्पेशल क्षण होता. मी 2016 पासून त्याला भेटण्याची वाट बघत होतो.

Leave a Comment