अमेरिकन संचार आयोगाच्या ऑफिसरपदी भारतीय वंशाच्या मनीषा घोष

(Source)

ट्रम्प प्रशासनाने भारतीय वंशाच्या डॉक्टर मोनीषा घोष यांनी अमेरिकेच्या फेडरल कम्यूनिकेशन कमिशनच्या चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर  म्हणून नियुक्त केले आहे. या पदावर पोहचणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. त्या 13 जानेवारीला पदभार स्विकारतील. भारतीय वंशाचे अजीत पई सध्या यावेळी कमिशनचे चेअरमन आहेत. मोनीषा घोष त्यांना तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंगच्या मुद्यावर सल्ला देईल. याचबरोबर त्या कमिशनच्या टेक्नोलॉजी डिपार्टमेंटसोबत काम करतील.

मोनीषा घोष यांनी 1986 मध्ये आयआयटी खडगपूर येथून बी.टेक केले होते. त्यानंतर युनिवर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी केली. एफसीसीमध्ये नियुक्तीच्या आधी त्या नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या कॉम्प्युटर नेटवर्क डिव्हिजनच्या प्रोग्राम डायरेक्टर होत्या. त्या युनिवर्सिटी ऑफ शिकागोमध्ये त्या रिसर्च प्रोफेसर देखील होत्या. येथे त्या वायरलेस टेक्नोलॉजीवरील रिसर्चमध्ये सहभागी होत्या. त्यांनी इंटरनेट ऑफ थिंग्स, 5जी आणि मॉर्डन वाय-फाय सिस्टमवर रिसर्च केला आहे.

फेडरल कम्यूनिकेशन कमिशन अमेरिकेच्या सर्व 50 राज्यामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन, वायर, सेटेलाईट आणि केबलच्या संचारणास नियंत्रित करते. ही एक स्वातंत्र सरकारी एजेंसी आहे. जी संचार संबंधित कायदे आणि नियम लागू करण्यास महत्वाची भूमिका बजावते.

एफसीसीचे चेअरमन अजीत पई यांच्यानुसार, घोष 5जी टेक्नोलॉजी क्षेत्रात अमेरिकेचे वर्चस्व निर्माण करण्यास मदत करतील. त्यांची नियुक्ती ऐतिहासिक सिद्ध होईल.

Leave a Comment