आता गुगल मॅप्सच्या मदतीने शोधा इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन

(Source)

सध्या अनेक कार कंपन्या इलेक्ट्रिक कार्स बाजारात आणत आहेत. मात्र या कारच्या विक्रीसाठी चार्जिंग स्टेशनचा मोठा हात आहे. आता इलेक्ट्रिक कारची बॅटरी संपल्यावर काळजी करण्याची गरज नाही. कारण आता तुमच्या आजुबाजूला इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन कोठे आहे, याची माहिती गुगल मॅप्स देणार आहे.

इलेक्ट्रिक कारसाठी सरकार आणि कार कंपन्या अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन बनवत आहेत. यासाठीच आता लोकांच्या मदतीसाठी गुगलने देखील मॅप्सद्वारे इलेक्ट्रिक कारच चार्जिंग स्टेशन दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल मॅप्सवर तुम्हाला Electric Vehicle Charging Station सर्च करावे लागेल. गुगल मॅप्स तुम्हाला कोणते चार्जिंग स्टेशन चालू आणि बंद आहे याची देखील माहिती देईल.

गुगल मॅप्सने युजर्सच्या सोयीसाठी अनेक नवनवीन फीचर आणले आहेत. काही दिवसांपुर्वीच गुगलने परदेशी स्थळांची नावे स्थानिक भाषेत सांगणारे खास फीचर देखील आणले होते.

 

Leave a Comment