ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान जंगलात आग विझवण्यासाठी उतरले, फोटो व्हायरल

(Source)

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबॉट यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्याच्या गणवेशात दिसत आहेत. सध्या ऑस्ट्रेलियातील जंगलामध्ये मोठा वणवा पेटला आहे. टोनी एबॉट हे दक्षिण सिडनीच्या जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी गेले होते. ते मागी एक दशकापासून ‘रूलर फायर सर्विस’सोबत वॉलंटिअर म्हणून कार्य करत आहेत.

62 वर्षीय टोनी आग विझवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत करत होते. तेव्हाच काही लोकांनी त्यांचे फोटो काढले. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टोनी एबॉट हे 2013 ते 2015 या काळात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान होते.

(Source)

टोनी एबॉट हे आग विझवण्यासाठी पोहचल्यानंतर देशातील इतर नेते कोठे आहेत ? असा प्रश्न आता ऑस्ट्रेलियातील नागरिक विचार आहेत.

ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये लागलेल्या आगीमुळे दुसऱ्या आणीबाणी लावण्यात आलेली आहे. आतापर्यंत 30 लाख एकरमध्ये पसरलेल्या या वणव्यामुळे 700 घरं उद्धवस्त झाली आहेत. 1700 पेक्षा अधिक कर्मचारी काम विझवण्याचे काम करत आहेत. शहराच्या आजूबाजूला 100 जागेवर आग लागल्याने शहरातील तापमान 45 डिग्रीपर्यंत पोहचले आहे.

Leave a Comment