अ‍ॅपल त्रुटी शोधणाऱ्याला देणार 10.7 कोटींचे बक्षीस

(Source)

टेक्नोलॉजी कंपनी अ‍ॅपलने आपले प्रोडक्ट आणि ऑपरेटिंग प्रोडक्ट सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. यासोबतच कंपनीने लोकांना एक खास आव्हान देखील दिले आहे. कंपनीने सिक्युरिटी बाउंटी प्रोग्राम घोषित करत, जी व्यक्ती कंपनीच्या प्रोडक्टमध्ये त्रुटी शोधून काढेल, त्यास बक्षीस म्हणून 10.7 कोटी रुपये देणार असल्याची म्हटले आहे.

अ‍ॅपलने म्हटले आहे की, जर तुम्ही कंपनीला माहिती नसलेली त्रुटी शोधून काढली व ती संबंधित डेव्हलपरसाठी विशेष असेल तर 50 टक्के बोनस देखील दिला जाईल. या आधी देखील कंपनीने अनेकदा युजर्सला बग शोधण्याचे आव्हान केलेले आहे व त्रुटी शोधणाऱ्याला मोठी रक्कम बक्षीस म्हणून देखील दिली आहे.

 

Leave a Comment