आक्षेपार्ह 6000 खाती ट्विटरने केली डिलीट


ट्विटरने पुन्हा एकदा मोठे पाऊल उचलून 6,000 हून अधिक खाती बंद केली आहेत. ट्विटरने जी खाती बंद केली आहेत ती सर्व सौदी अरेबियाची आहेत. ही खाती बंद केल्यावर ट्विटर म्हणते की हे सर्व वापरकर्ते त्याच्या धोरणाचे उल्लंघन करत होते आणि इतर वापरकर्त्यांना लक्ष केंद्रीत करत त्यांना ट्रोल करत होत होते. सौदी अरेबियातील दूतावासाने अद्याप यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

ट्विटरने म्हटले आहे की अशी 88,000 खाती स्पॅम पसरविणारी ओळखली गेली आहेत. या खात्यांमधून विशिष्ट विषयावर स्पॅम सामग्री दिली जाते. यापैकी 5929 खाती हटविली गेली आहेत. तत्पूर्वी यावर्षी ऑगस्टमध्ये ट्विटरने दोन लाख चिनी अकाउंट्स बंद केली होती, जी हांगकांग निषेधाशी संबंधित होती.

वास्तविक हे खाते निलंबित करणे याच निर्णयाचा एक भाग आहे ज्यात सोशल मीडिया कंपन्यांनी असे म्हटले आहे की ते त्यांच्या व्यासपीठावर आक्षेपार्ह आणि चुकीची माहिती असलेल्या सामग्रीस परवानगी देणार नाहीत. सन 2016मध्ये देखील अमेरिकेच्या निवडणुकांच्या वेळी बरीच खाती बंद केली गेली होती, जी रशियाची होती. ही खाती राजकीय पक्षांच्या फायद्यासाठी वापरली जात होती.

विशेष म्हणजे, सुमारे 60 खात्यांमधून आक्षेपार्ह मजकूर काढून त्यांना निष्क्रिय करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अलीकडेच फेसबुक आणि ट्विटरसह विविध सोशल मीडिया मंचांकडून पत्रे लिहिली आहेत. गुरुवारी ही माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात अफवा रोखण्याचे काम सध्या पोलिस करत आहेत.

ते म्हणाले की, अफवा पसरविणाऱ्या वापरकर्त्यांच्या खात्यांची माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांनी लोकांना केले आहे. दिल्ली पोलिसांनी ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांना त्यांच्या व्यासपीठावर आक्षेपार्ह सामग्री काढण्यासाठी पत्र लिहिले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, आम्ही गेल्या तीन-चार दिवसांपासून सोशल मीडिया हँडलवर नजर ठेवत आहोत आणि आक्षेपार्ह सामग्री आणि तणावपूर्ण पोस्ट्स ओळखली जात असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment