सुंदर पिचाईंना दुप्पट वेतनासह मिळणार कोट्यावधींचे शेअर


सॅन फ्रान्सिस्को – गुगलपाठोपाठ अल्फाबेटचेही सीईओ झाल्यानंतर भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांना घसघशीत रक्कम मिळणार आहे. त्यांचे वेतन दुप्पट होणार आहेच पण त्यांना कोट्यावधींच्या शेअरसह सुमारे १ हजार ६९४ हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

२४ कोटी डॉलरचे शेअर सुंदर पिचाई यांना बक्षीस म्हणून मिळणार आहेत. यामधील ९ कोटी डॉलर हे अल्फाबेटमधील कामगिरीबद्दल देण्यात येणार आहेत. पुढील वर्षी जानेवारीपासून सुंदर पिचाईंचे वेतन १० लाख डॉलरहून २० लाख डॉलर करण्यात आल्याची माहिती अल्फाबेट कंपनीने सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनला दिली आहे.

गुगलबरोबर अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सुंदर पिचाईंना जबाबदारी देण्यात आल्यामुळे त्यांचे वेतन वाढविण्यात आल्याचे अल्फाबेटने म्हटले आहे. ९ कोटी डॉलरचे शेअर पिचाई यांना बक्षीस म्हणून गुरुवारी देण्यात आले आहे. त्याचबरोबर १२ कोटी डॉलर आणि ३ कोटी डॉलर असे दोनवेळा शेअर पिचाई यांना बक्षीस म्हणून देण्यात आलेले आहेत. हे शेअर त्यांच्या कामगिरीवर नव्हे तर त्यांनी पुढेही कंपनीसमवेत काम करावे, यासाठी देण्यात आलेले आहेत.

Leave a Comment