हैदराबाद एनकाऊंटरमध्ये ठार झालेल्या आरोपींचे शवविच्छेदन पुन्हा करा


हैदराबाद – तेलंगणा उच्च न्यायालयाने पशुवैद्यकीय महिला डॉक्टर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एनकाऊंटर झालेल्या चारही आरोपींचे शवविच्छेदन पुन्हा करण्याचे आदेश दिले आहेत. हैदराबादजवळील चट्टनपल्ली येथे पोलीस एनकाऊंटरमध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

चारही मृतदेह हैदराबादमधील गांधी रुग्णालयातील शवागरामध्ये ठेवण्यात आले असून चौकशीसाठी घटनास्थळावर आरोपींना नेले असता पोलिसांवर त्यांनी हल्ला केला होता, तसेच पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून देशभरामध्ये खळबळ उडाली होती.

Leave a Comment