देशातील शरणार्थ्यांना पहिले बाहेर हाकला – राज ठाकरे


पुणे – आपल्या देशात बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून येणाऱ्यांना बाहेर हाकलेच पाहिजे. त्याचबरोबर नेपाळ, पाकिस्तानातून किती शरणार्थी आले त्याची तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले. पुण्यामध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मनसेचे पुण्यामध्ये शिबिर सुरु आहे.

देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या हिंसक आंदोलन सुरु आहे. राज ठाकरे यांनी त्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली. भारत हा काही धर्मशाळा नाही. फक्त भारताने माणुसकीचा ठेका घेतलेला नाही. येथे राहणाऱ्या मुस्लिम नागरिकांना असुरक्षित वाटण्याची अजिबात गरज नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

त्याचबरोबर राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. बाहेरून आलेल्या लोकांची आपल्या देशाला काय आवश्यकता असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले. अनेक सिस्टम्स लोकसंख्येमुळे फेल गेल्यामुळे कोणत्याही धर्मचा माणूस असेल त्याला बाहेरून आपल्या देशात आणायची काय गरज असल्याचे ते म्हणाले. जे मुस्लिम नागरिक आपल्या देशात राहतात त्यांना असुरक्षित वाटण्याचे कारण काय? भारत ही काही सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी धर्मशाळा नाही. अन्य देशातून आलेल्या लोकांना हकलावून दिले पाहिजे. फक्त भारतानेच माणुसकीचा ठेका हा काही घेतलेला नाही. येथे राहत असलेल्यांची चिंता मिटत नाही, तर बाहेरून आणखी लोक का हवी, असा सवालही त्यांनी केला.

Leave a Comment