नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही


कोल्हापूर – शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही असून आपला देश माणसांचा आहे पण, देशभक्तांचा नसने हे आपले दुर्दैव असल्याचे म्हटले आहे.

या कायद्याचे देशभक्त असलेल्या कुठल्याही नागरिकाला कौतुक वाटेल. याचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असलेल्या कोट्यवधी भारतीयांना आनंद झाला पाहिजे. पण याला लोक विरोध करत आहेत. कायद्याला विरोध करून गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकत्व कायद्यावरून नंगा नाच सुरू असल्याचेही भिडे म्हणाले.

यापूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करा, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी सुद्धा केली होती. त्याचा व्हिडिओही आता व्हायरल होतो आहे. या कायद्याला शिवसेनेने विरोध केलेला नाही आणि करणार नाही. फालतू माणसाबद्दल विचार करून राष्ट्राने आपला वेळ वाया घालवू नये. ज्यांना काही उंची नाही, अशी माणसेही राजकारणात आले हे देशाचे दुर्दैव आहे, अशी राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका संभाजी भिडे यांनी केली.

Leave a Comment