ड्रायव्हरलेस कारला भारतात मिळणार नाही परवानगी


नवी दिल्ली – ड्रायव्हरलेस कारला देशात परवानगी देणार नसल्याची भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केली. गडकरी पुढे म्हणाले, ड्रायव्हरलेस कारबाबत मला अनेकदा प्रश्न विचारण्यात येतात. पण मी जोपर्यंत वाहतूक मंत्री आहे, तोपर्यंत ते शक्य नाही. भारतात ड्रायव्हरलेस कारला परवानगी देणार नाही.

२२ लाख चालकांची देशात कमतरता असून देशात तसेच उद्योगात रोजगार वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, अंतिम टप्प्यात वाहने भंगारात (स्क्रॅपेज) काढण्याचे धोरण आले आहे. आम्ही ते धोरण आणले तर १०० टक्के खर्च वाचणार आहे. कारण कच्चा माल हा स्वस्त होणार असल्यामुळे भारत हा वाहन निर्मिती आणि ई-वाहनांच्या निर्मितीत हब होणार आहे. तसे जर झाले तर निश्चितच ५ लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेत वाहन उद्योगाचे योगदान ठरणार आहे. ४.५ लाख कोटींचा वाहन उद्योग असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, टेस्ला या कंपनीने अमेरिकेत चालकविरहीत चारचाकीची निर्मिती केली आहे.

Leave a Comment