अपुऱ्या झोपेमुळे मुलांमध्ये लट्ठपणा


डेन्मार्क – आपल्या मुलांची झोप अपुरी होत असल्यास पालकांनी सावधानता बाळगली पाहिजे, कारण पुरेशी झोप न झाल्याने या मुलांचे वजन वाढण्याची व ते लट्ठ होण्याची शक्यता अधिक असते.

रायटर या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुरेशी झोप मिळत नसलेले मुले लठ्ठ होतात, त्यांचे वजनही प्रमाणापेक्षा अधिक वाढते, असा निष्कर्ष डेन्मार्क येथील संशोधकांनी काढला आहे.

सामान्य वजन असलेल्या दोन ते सहा वर्ष वयोगटातील 368 मुलांच्या अभ्यासावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यात मुलांच्या लठ्ठपणावर काळजी व्यक्त करण्यात आली आहे. अपुरी झोप हे अनेक आजारांचे कारण आहे, पण नवीन अभ्यासानुसार लहान मुलांमध्ये पुरेशा झोपेच्या अभावामुळे मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात, यावर संशोधकांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment