7 पाकिस्तानी शरणार्थींना भारतीय नागरिकत्व


नवी दिल्ली – देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात आंदोलने सुरू असताना गुजरातमधील कच्छमध्ये 7 पाकिस्तानी हिंदू शरणार्थींना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आल्याची माहिती भाजपचे महासचिव मनसुख मांडविया यांनी ट्विट करून दिली आहे.


पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींची भाजपचे महासचिव मनसुख मांडविया यांनी भेट घेतली. भारतीय नागरिकत्व 7 पाकिस्तानी शरणार्थींना दिले आहे. या लोकांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे उत्सवाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे या लोकांच्या जीवनात एक नवीन पहाट आली असल्याचे मांडविया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नागरिकत्व सुधारणा काद्याविरोधात देशभरात सध्या आंदोलन सुरू असून अनेक हिंसेच्या घटना घडत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांत आंदोलन चिघळले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Leave a Comment