योगसाधना करताना सावधान


योग साधना ही आरोग्यासाठी आवश्यक ठरली असून निरामय जगण्यासाठी ती उपयुक्त ठरत असल्याचे सारे जग मानत आहे. त्यामुळे आजवर या साधनेच्या वाटेला न गेलेले अनेक लोक योग साधना करायला लागले आहेत पण, या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी अशा उत्साही योग साधकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. काही योगासने ही उपयुक्त वाटत असली तरीही ते योग्य त्या योग शिक्षकाच्या मार्गदर्शना खालीच केली पाहिजेत अन्यथा आसनामुळे फायद्याऐवजी तोटाच होईल असे या तज्ञांनी बजावले आहे. कारण कोणाचे मार्गदर्शन नसेल तर ती आसने चुकीच्या पद्धतीने केली जाण्याची शक्यता आहे. तसे केल्याने आपल्या दैनंदिन व्यवहारातही अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.

एकदा मार्गदर्शनाखाली आसन सिद्ध झाले की मग मात्र आपण ती स्वत: होऊन करायला काही हरकत नाही. योग तज्ञ मीनाक्षी फुल्लारा यांनीही असाच इशारा दिला आहेच पण काही वेळा काही उत्साही योग साधक योगासनांचा उपयोग होतोय असे अनुभवाला यागला लागले की अधिक वेळ योगासने करीत बसतात आणि शरीराला कमाल कष्ट देणे म्हणजे योगसाधना असे मानून कठिणात कठिण आसने करायला लागतात. अशा अती व्यायामाचेही अनेक गैरफायदे आहेत. काही वेळा अशा अविवेकी व्यायामाने काही सांध्यात दोष निर्माण होण्याची शक्यता असते तर काही सांध्यांना कायमची दुखापत होण्याची भीती असते. तेव्हा योगापासनेत केवळ योग शिक्षकाचाच नाही तर फिजियोथेरपिस्टाचाही सल्ला घेणे गरजेचे असते.

चुकीच्या योगामुळे काही वेळा पाठीत वेदना होण्याची शक्यता असते. पश्‍चिमोत्तानासन करताना आपल्या पाठीचा कणा वळवलेला असतो. हे आसन योग्य प्रकारे केले तर ठीक पण ते नीट केले नाही तर पाठीच्या कण्याला इजा होऊ शकते. शिवाय स्लिप डिस्कही निसटू शकते. याच दोषामुळे नितंबांच्या हाडांतही दोष निर्माण होतो. काही आसनांत हातावर शरीराचा भार टाकलेला असतो. मयुरासन हे असेच एक आसन होय. हे आसन करणारा वजनाने भारी असेल आणि त्याची मनगटे मजबूत नसतील तर मनगटाचा सांधा पिचला जाऊ शकतो. तेव्हा मयुरासन करण्यापूर्वी एखाद्या डॉक्टराचाही सल्ला घेणे उचित ठरते.
आपले मनगट किती मजबूत आहे याचा अंदाज त्याच्याकडून येऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment