फिनलंडमध्ये बाळाला जन्म द्या- ८ लाख मिळवा


जगभरात भारत आणि चीन सारखे बलाढ्य देश वाढत्या लोकसंख्येने हैराण होऊन अनेक उपाय योजना राबवीत असताना युरोपातील काही देश घटत्या जन्मदरामुळे हैराण झाले आहेत आणि देशाचा जन्मदर वाढावा म्हणून मुले जन्माला घालण्यासाठी पालकांना प्रोत्साहन देत आहेत त्यासाठी मोठ्या रकमांची घोषणा करत आहेत असे सध्याचे चित्र आहे.

युरोप मधील सुंदर देश फिनलंड मधील एक छोटी नगरपालिका लेस्तीझार्व्हीने याच समस्येवर उपाय म्हणून बेबी बोनस योजना जाहीर केली आहे. त्यात नवीन जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलासाठी पुढची १० वर्षे मुलाचा आईला १० हजार युरो म्हणजे ८ लाख रुपये दिले जात आहेत. या योजनेचा सकारात्मक परिणाम दिसू लागल्याचे समजते.

फिनलंड सरकारसुद्धा मूल जन्माला घालणाऱ्या कुटुंबाना बेबी बॉक्स स्टार्टर किट देत असून फिनलंडच्या अन्य काही गावाच्या नगरपालिका आई वडिलांना ७० टक्के पगारासह नऊ महिन्याची सुट्टी देत आहे.

Leave a Comment