३५० रुपयांची नोट जारी केल्याची माहिती खोटी


सोशल मीडियावर गेले काही दिवस भारतीय चलनातील नोटांची गड्डी व्हायरल झाली असून या चित्रात ३५० रु. मुल्याची नोट दिसत आहे. रिझर्व बँकेने ३५० रुपयांची नवी नोट चलनात आणल्याची बातमी अफवा असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

गेले काही दिवस एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एका माणसाच्या हातात ३५० रुपये नोटांच्या दोन गड्ड्या दाखविल्या जात आहेत. फेसबुक सह अन्य सोशल मिडिया युजरनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. भारतात नवीन नोटा चलनात आणण्याचा अधिकार रिझर्व बँकेकडे आहे. आणि या बँकेकडून ज्या नोटा चलनात जारी केल्या जातात त्या सर्वाचे फोटो बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर आहेत. त्यानुसार सध्या १०,२०,५०,१००,२००,५०० आणि २००० च्या नव्या नोटा चलनात आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी जाहीर झाल्यावर पूर्वीच्या ५०० व १००० रु. मूल्याच्या नोटा रद्द झाल्या होत्या १००० च्या जागी २००० रुपयंची नवी नोट चलनात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या सोशल मिडीयावर जी नोट ३५० रुपयाची म्हणून शेअर केली जात आहे ती प्रत्यक्षात २०० ची नोट असून त्यात छेडछाड केली गेली असल्याचे आरबीआय प्रवक्त्याने सांगितले असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे.

Leave a Comment