अॅपल सीईओ टीम कुकने केली भारतीय पगडीची तारीफ


अॅपल इंकचा सीईओ टीम कुक यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर भारतीय पगडीची तारीफ केली असून भारतीय पगडीमधून साहसाचे दर्शन होते असे लिहिले आहे. जीक्यू इंडियाच्या टीम साठी समर्थन देताना टीम कुक यांनी हे विधान केले आहे.

जीक्यू इंडियाने त्याच्या वेबसाईटवर फोटोग्राफर विक्रमजीत बॉस यांनी काही भारतीयांचे पगडीतील फोटो शेअर केले आहेत. आणि त्यात भारतीय पगडी बहु आयामी असल्याचे तसेच भारतीयांची प्रतिभा आणि गरिमा यांचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे. कुक यांनी विक्रमजीत यांनी काढलेले फोटो खुपच चांगले असून त्यातून भारतीय पगडीतून साहसाचे दर्शन होते असे म्हटले आहे. विविध रंगातील पगड्यांचे बारकावे फोटो मधून स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

टीम कुक यांनी स्मार्टफोन इंडस्ट्रीची वाढ आता थांबली असल्याच्या विधानावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले स्मार्टफोन उद्योग अजून १२ वर्षाचा होतो आहे आणि इतक्यातच तो मॅॅच्युअर् कसा होऊ शकेल याचा विचार केला पाहिजे. अर्थात टीम काहीही म्हणाले असले तर गेल्या काही वर्षात आयफोनचा सेल आणि शिपमेंट मध्ये सातत्याने घसरण होत आहे असे आकडेवारीवरून दिसून आले आहे. या वर्षीच्या चौथ्या आणि अखेरच्या भागात आयफोन सेलमध्ये वाढ दिसेल असा दावा कुक यांनी केला आहे.

Leave a Comment