जगभरातील डॉक्टर्स आणि नर्सना ब्रिटन देणार ‘फास्ट ट्रॅक’ व्हिसा

(Source)

ब्रिटनच्या नवीन सरकारने जगभरातील डॉक्टर्स आणि नर्सना फास्ट ट्रॅक व्हिसा देण्याच्या योजनेला अंतिम स्वरूप दिले आहे. ही योजना लवकरच लागू होणार आहे. सरकारी नॅशनल हेल्थ सर्विसमध्ये (एनएचएस) डॉक्टर आणि नर्सच्या कमतरतेमुळे ही योजना तयार करण्यत आलेली आहे.

या योजनेचा मोठा फायदा भारतीय डॉक्टर्स आणि नर्सना होईल. पंधप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या व्हिजाला ‘एनएचएस’ व्हिसा असे नाव दिले आहे. संसदेत महाराणी एलिजाबेथ यांनी अभिभाषणा दरम्यान देखील या योजनेचा उल्लेख केला. महाराणी एलिजाबेथ म्हणाल्या की, सरकारच्या या योजनेमुळे नॅशनल हेल्थ सर्विसला ताकद मिळेल.

नवीन डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय सहाय्याने ब्रिटनचे आरोग्य सेवा अधिक चांगली होईल. जॉन्सन सरकारने निवडणुकीच्या आधी देखील प्राथमिकतेच्या आधारावर व्हिसा देण्याची घोषणा केली होती. ते जगभरातील चांगल्या डॉक्टर्स व नर्सला ब्रिटनमध्ये बोलवत आहेत. ब्रेक्झिट प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक नीतींमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment