संग्रहालय आणि आर्ट गॅलरींना भेट दिल्याने वाढते आयुष्य

(Source)

संग्रहालय, थेअटर, संगीत आणि आर्ट गॅलरींना वारंवार भेट दिल्याने लोकांचे आयुष्य वाढू शकते, असे यूकेमधील एका अभ्यासात समोर आले आहे. हे संशोधन बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहे.

या अभ्यासात सांगण्यात आले आहे की, जे लोक नियमितरित्या थेअटर, संगीत आणि आर्ट सारख्या कलांशी जोडलेले असतात त्यांचे आरोग्य चांगले असते आणि त्यांच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल होतो. अभ्यासात समोर आले की, कलेशी जोडलेले लोकांच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होते.

ब्रिटनच्या युनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी कलेमध्ये व्यस्त असणे आणि मृत्यू दराच्या विविध आवृत्त्यांमधील संबंध शोधण्यासाठी काम केले. हा निष्कर्ष यूकेमधील 50 पेक्षा अधिक वय असलेल्या 6000 लोकांच्या आकडेवारीवर आधारीत आहे. 2004-05 मध्ये या अभ्यासास सुरूवात झाली होती. ज्यामध्ये थेअटर, संगीत, ओपेरा, संग्रहालय, आर्ट गॅलरीज आणि साहित्य कला या गोष्टींचा समावेश होता.

या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांवर 12 वर्ष अभ्यास करण्यात आला. या दरम्यान यूके नॅशनल हेल्थ सर्विस मोर्टार डेटाचा वापर करून मृत्यूची नोंद करण्यात आली.

अभ्यासात समोर आले की, जे लोक वर्षातून 1 ते 2 वेळा कलेशी जोडलेले जातात त्यांच्या मृत्यूचा धोका 14 टक्क्यांनी कमी होतो. जे लोक वर्षातून अनेकवेळा कलेसंबंधित गोष्टीशी जोडलेले असतात, त्यांच्या मृत्यूचा धोका 31 टक्क्यांनी कमी होतो.

Leave a Comment