अरेच्चा ! चक्क 7 महिन्यांच्या बाळाने घेतली महापौर पदाची शपथ

(Source)

अमेरिकेच्या व्हाइटहॉल येथा 7 महिन्यांच्या विलियम चार्ली मॅकमिलनला महापौर करण्यात आले आहे. चार्ली एवढ्या कमी वयात महापौर बनणारे पहिलेच बाळ असेल. चार्लीच्या शपथग्रहण समारंभाला 150 लोक उपस्थित होते.

चार्लीला याआधी ऑक्टोंबरमध्ये ग्राइम्स काउंटीचा महापौर बनवण्यात आले होते. दरवर्षी व्हाइटहॉल वोलंटिअर फायर डिपार्टमेंटच्या वार्षिक बीबीक्यू फंडरेजर प्रोग्राम अंतर्गत महापौर पदासाठी बोली लावली जाते. यंदा चार्लीच्या नावावर सर्वाधिक बोली लावण्यात आली व त्याची देशातील सर्वात कमी वयाचा महापौर म्हणून निवड झाली. इतरांची निवड झाली तर महापौराचे काम हे महापौरच करत असतो.

चार्लीच्या शपथग्रहणावेळी त्याचे शब्द त्याच्या आई-वडिलांनी उच्चारले. यामध्ये म्हटले की, मी विलियम चार्ली मॅकमिलन वचन देतो की, व्हाइटहॉलच्या महापौर पदावर ईमानदारी आणि आपल्या क्षमतेनुसार कार्य करेल.

या शपथग्रहण समारंभाचे आयोजन चार्लीच्या आई-वडिलांनी केले होते. यावेळी देशभक्तीची गाणी वाजवण्यात आली. शाळेतील विद्यार्थींनी डान्स देखील केला.

Leave a Comment