भारतात नोकरी करण्यासाठी या आहेत सर्वोत्तम कंपन्या

(Source)

भारतात आयटी क्षेत्रात नोकरी करण्याच्या दृष्टीने सॅप (SAP) सर्वोत्तम कंपनी असल्याचे समोर आले आहे. कर्मचाऱ्यांच्या रेटिंग आणि रिव्ह्यूच्या आधावारव कंपनीला हे स्थान मिळाले आहे. इनडीड (indeed) वेबसाईटने वर्तमान आणि माजी कर्मचाऱ्यांच्या मध्ये अभ्यास केला होता. सॅपनंतर दुसऱ्या स्थानावर एडोब (Adobe) त्यानंतर वीएमवेअर (VMware) आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) देशात काम करण्यासाठी टॉप टेक्नोलॉजी कंपन्या आहेत.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) या यादीत पाचव्या स्थानावर आहे. मागील वर्षी इस्त्रो 10व्या स्थानावर होती. ई-कॉमर्स कंपन्या मिंत्रा, पेटीएम, फ्लिपकार्ट आणि आयटी कंपनी टाटा कंस्लटंसी सर्विसेज देखील या यादीत आहेत.

इनडीडनुसार, टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये 15 टॉप कंपन्यांमध्ये सिस्को, आयबीएम, अपल, एमडॉक्स आणि जेनपॅक्टचा देखील समावेश आहे. इनडीडने 2019 मध्ये केलेल्या सर्वेक्षणमध्ये सांगितले आहे की, भारतातील 97 टक्के नोकरी शोधणारे लोक कंपनीच्या नावलौकिकाचा अधिक विचार करतात.

Leave a Comment