रिंग गर्ल एरियनी सेलेस्टे आपल्या चाहत्यांसाठी नववर्षाची हॉट भेट


आपल्या चाहत्यांना खास ख्रिसमसनिमित्त नववर्षाची एकाच वेळी लाखो डॉलर कमावणारी युएफसीची (Ultimate Fighting Championship) पहिली रिंग गर्ल एरियनी सेलेस्टे हिने भेट दिली आहे. सन 2020 या नववर्षाच्या कॅलेंडरसाठी एरियनी सेलेस्टे हिने खास फोटोशूट केले आहे. लाल बिकिनीत एरियनी सेलेस्टे खूपच हॉट दिसत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट, सोशल मीडिया आणि वेबसाईट आदिंवरही आपल्या खास फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.


तिने एका फोटोखाली खास कॅप्शनही दिली आहे. त्या ती म्हणते की, चला सँटाला सांगूया की आम्ही क्रिसमसमध्ये वास्तवात काय अपेक्षा करतो. सेलेस्टे हिची स्वाक्षरी असलेले हे कॅलेंडर तिचे चाहते 39 अमेरिकी डॉलर (भारतीय रुपयांत सुमारे 28 हजार रुपये) किमतीत खरेदी करु शकतात.


एरियनी हिचे फोटो असलेल्या या कॅलेंडरवर तिची स्वाक्षरी आणि खास संदेशही असणार आहे. हे कॅलेंडर तिचे चाहते मोठ्या प्रमाणवर खरेदी करतील अशी आशा आहे.


2006 पासून 34 वर्षीय एरियनी सेलेस्टे युएफसीची रिंग गर्ल आहे. त्या 8 रिंगमध्ये एरियनी सहभागी आहे. ज्यात युएफसीचे सर्वाधिक चर्चित चेहरे आहेत. त्याचबरोबर 5 वेळा रिंग गर्ल ऑफ द इयर हा खिताब एरियनी सेलेस्टेने जिंकला आहे.


केवळ युएफसी रिंग पर्यंतच मिक्स मार्शल आर्ट्सची या रिंग गर्लची ओळख सीमित नाही. एरियनी अत्यंत यशस्वी मॉडेल देखील आहे. त्याचबरोबर ती उत्तम जिमनास्ट आणि डान्सरही आहे. काही काळ तिने चिअरलीडर म्हणूनही काम पाहिले आहे.


केवळ आपल्या इन्स्टाग्राम पेजवरच एरियनी आपले हॉट फोटो शेअर करत असते. एरियनी हिचे इन्स्टाग्रामवर जवळबास 32 लाख 53 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. एरियनी हिचे ट्विटरवरही जवळबास 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.


प्लेबॉय, मॅक्सिम यूएस, एफएचएम, मॅक्सिम कोरिया, मॅक्सिम फिलिपींस, एफएचएम ऑस्ट्रेलिया आणि एएफसी आदी मासिकांच्या मुखपृष्ठांवरही एरियनी सेलेस्टे झळकली आहे. तसेच, स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेडच्या फेब्रुवारीच्या अंकावर लेडी ऑफ द डेसुद्धा सेलेस्टे राहिली आहे. एक टीव्ही शोसुद्धा एरियनी सेलेस्टेहोस्ट करते. 2014 ते 2015 दरम्यान, तिने वेलोसिटी टेलिविजनवर ‘ओवरहालिन’चे 7 एपिसोड होस्ट केले आहेत.


दरम्यान, रिंग गर्ल ती असते जी खेळ सुरु असताना खेळामध्ये रिंगमधून प्रवेश करते. एक बिलबोर्ज तिच्या हातात असतो. एक क्रमांक ज्यावर लिहिलेला असतो. सामन्यातील कोणती फेरी सुरु आहे हा क्रमांक ते सांगतो. बॉक्सिंग, किकबॉक्सिंग आणि मिक्स्ड मार्शल आर्ट्स अशा सामन्यांमध्ये रिंग गर्ल पाहायला मिळतात.

Leave a Comment