बुमराहची फिटनेस चाचणी करण्यास एनसीएचा नकार

(Source)

बीसीसीआयच्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमहारची फिटनेस चाचणी करण्यास नकार दिला आहे. बुमराह 16 डिसेंबरला भारतीय संघासोबत फिटनेस चाचणीसाठी विशाखापट्टनमला पोहचला होता. पुनरागमनसाठी ही फिटनेस चाचणी महत्त्वाची आहे.

मात्र राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील टीम आणि फिजिओथेरिपिस्ट अशिष कौशिक यांनी बुमराहला फिटनेस चाचणी करण्यास नकार दिला.  बुमराहने सप्टेंबरमध्ये पाठीच्या दुखापतीनंतर एनसीएमध्ये उपचार घेण्याऐवजी स्वतःच्या तज्ञ व यूकेमधील डॉक्टरांची मदत घेतल्याने एनसीए ही चाचणी करण्यास तयार नाही.

याविषयी द्रविड यांचे मत स्पष्ट असून, ‘जर एनसीएमध्ये बुमराहवर उपचार झाले नाहीत तर त्याला सर्टिफिकेट कसे देता येईल ? जर पुढे जाऊन काही झाले तर ? ज्या गोष्टीबद्दल माहितीच नाही त्याला एनसीए तयार कसे होईल ?’

एनसीएमध्ये उपचार घेण्यासाठी बुमराहने टाळाटाळ केली कारण इतर खेळाडूंकडून त्याला एनसीएविषयी नकारात्मक गोष्टींची माहिती मिळाली. अनेक वरिष्ठ खेळाडू देखील एनसीएमध्ये जाण्यास तयार नसतात.

मात्र एनसीएने फिटनेस चाचणी करण्यास नकार दिल्याने बुमराह ही चाचणी कोठे करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. बुमहारची आयपीएल फ्रेन्चाईजी मुंबई इंडियन्स देखील बुमराहच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देऊन आहे.

राहुल द्रविड यांनी काही महिन्यांपुर्वीच एनसीएचे प्रमुख पद स्विकारले आहे.

 

Leave a Comment