युवकाने आजीबाईंना विमानात दिली ही खास ऑफर, नेटकरी करत आहेत कौतूक

(Source)

वर्जिन एटलांटिकच्या प्लाईटमध्ये एका युवकाने 88 वर्षीय वृद्ध महिलेसाठी जे केले, त्यासाठी त्या युवकावर सोशल मीडियामधून कौतूकाचा वर्षाव होत आहे. न्युयॉर्क ते लंडन जाणाऱ्या प्लाईटमध्ये 88 वर्षीय वृद्ध महिला वॉयलेट एलिसन इकोनॉमी क्लासने प्रवास करत होत्या. काही दिवसांपुर्वीच त्यांच्या गुडघ्याचे प्रत्यार्पण झाले असल्याने त्यांना व्यवस्थित बसता येत नव्हते.

एलिसन यांना होणारा त्रास युवक जॅक लिटिनजॉनने पाहिला व त्यांना मदत करण्याचे ठरवले. जॅकने त्या महिलेकडे जात त्यांना बिझनेस क्लासमध्ये बसून प्रवास करा असे सांगितले. एलिसन यांना आधी जॅकवर विश्वासच बसला नाही. त्यांनी तू मस्करी तर करत नाहीस ना ? असे देखील विचारले. तेव्हा जॅकने तो खरचं मनापासून म्हणत असल्याचे सांगितले व एलिसन बिझनेस क्लासमधून प्रवास करण्यास तयार झाल्या.

Of the hundreds of flights I’ve operated, I’ve had the pleasure of looking after footballers, supermodels and some…

Posted by Leah Amy on Tuesday, December 10, 2019

या घटनेला प्लाईट अटेंडड लेह एमीने फेसबुकवर शेअर केले आहे. एमीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, मी अनेक प्लाईट्स ऑपरेट केल्या. मला फुटबॉलर्स, हॉलिवूड सेलिब्रेटी आणि सुपर मॉडेल्सना भेटण्याची देखील संधी मिळाली. मात्र आज मी तुम्हाला माझ्या सर्वात आवडत्या प्रवाशांविषयी सांगणार आहे. ते आहेत – जॅक आणि वॉयलेट. न्यूयॉर्कवरून घरी जाण्यासाठी जॅक आणि त्यांच्या कुटूंबाने बिझनेस क्लासचे तिकिट काढले होते. मात्र जॅकला वॉयलेट दिसल्यावर त्याने त्यांच्या इकोनॉमी क्लासमधील सीटशी स्वतःचे सीट बदलले.

एमीने पुढे लिहिले की, 88 वर्षीय वॉयलेट या यूके आणि अमेरिकेत नर्स होत्या. गुडघ्याच्या प्रत्यार्पणामुळे त्यांना बसण्यास अडचण होत होती. त्यांना नेहमीच विमानाच्या फ्रंट सेक्शनमध्ये बसून प्रवास करायचा होता. आज अखेर जॅक मुळे त्यांचे स्वप्न पुर्ण झाले.

 

Leave a Comment