आयपीएल लिलाव : प्रसिद्धीच्या झोतात नसलेले 5 खेळाडू झाले कोट्याधीश

(Source)

कोलकात्यात काल इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) 2020 च्या सीझनसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात अनेक खेळाडूंचे नशीबच बदलले आहे. फ्रेन्चाईजींनी अनेक युवा खेळाडूंवर मोठी बोली लावली. अशाच 5 युवा खेळाडूंविषयी जाणून घेऊया ज्यांच्यावर कोट्यावधींची बोली लागली आहे.

(Source)

वरूण चक्रवर्ती –

मागील वर्षी 8.40 कोटी रुपयांमध्ये विकल्या गेलेल्या वरूण चक्रवर्तीवर यंदा कोलकाता नाइट रायडर्सने 4 कोटींची बोली लावली. सात वेगवेगळ्या प्रकारची बॉल फेकू शकणाऱ्या वरूणला यंदा पंजाबने आपल्या टीममधून रिलीज केले. त्यानंतर केकेआरने पीयूष चावलाच्या जागी त्याला संघात घेतले.

(Source)

यशस्वी जयस्वाल –

मुंबईचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वालला राजस्थान रॉयल्सने 2 कोटी 40 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. 17 वर्षीय यशस्वीने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शानदार दुहेरी शतक ठोकले होते. दुहेरी शतक ठोकणारा तो सर्वात युवा खेळाडू आहे. त्याने यंदाच्या सीझनमध्ये 3 शतक आणि 1 अर्धशतकाच्या जोरावर 112.80 च्या सरासरीने धावा केल्या. त्याची भारताच्या अंडर-19 विश्वचषकाच्या संघात देखील निवड झाली आहे.

(Source)

प्रियम गर्ग-

भारतीय अंडर -19 विश्वचषकासाठी निवड झालेला कर्णधार प्रियम गर्गला सनराइजर्स हैदराबादने 1 कोटी 90 लाख रुपयात खरेदी केले. प्रियमने 2018-19 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये 10 सामन्यात तब्बल 814 धावा करत सर्वांना प्रभावित केले होते. त्याने आतापर्यंत 12 फर्स्ट क्लास सामन्यात 65 च्या सरासरीने 867 धावा केल्या आहेत.

(Source)

विराट सिंह –

20 लाख रुपये बेस प्राइस असणाऱ्या विराट सिंहला सनराइजर्स हैदराबादने 1 कोटी 90 लाखात खरेदी केले. विराटने सैय्यद मुश्ताफ अली स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले होते. त्याने स्पर्धेत 10 सामन्यात 142.32 च्या स्ट्राईकरेटने 343 धावा केल्या.

(Source)

रवि बिश्नोई –

भारतीय लेग स्पिनर रवि बिश्नोईला 2 कोटी रुपयांमध्ये किंग्ल इलेव्हन पंजाबच्या टीमने आपल्या संघात घेतले. संघाचे डायरेक्टर अनिल कुंबळे यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला.

Leave a Comment