बहुप्रतिक्षित सेडान कार ‘ह्युंडाई ऑरा’चा फर्स्ट लूक आला समोर

(Source)

कार कंपनी ह्युंडाईने आपली नवीन सेडान कार ‘ह्युंडाई ऑरा’वरील पडदा हटवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ह्युंडाई ऑराबद्दल चर्चा सुरू होती. नवीन वर्षात जानेवारी महिन्यात ही कार भारतात लाँच होईल. ही कार मारूती सुझुकी डीझायर, होंडा अमेझ, फोर्ड एस्पायर या गाड्यांना टक्कर देईल.

या सेडान कारमध्ये बीएस6 इंजिन देण्यात आले आहे. या आधी कंपनीने ग्रँड आय10 आयमध्ये देखील बीएस6 इंजिन दिले होते.

(Source)

ह्युंडाई ऑरामध्ये बीएस6 1.2 लीटर Kappa T-GDI चार सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 74 एचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जेनरेट करते. यामध्ये तीन सिलेंडर 1.2 लीटर ECOTORQ डिझेल इंजिन देखील मिळेल, जे 74 एचपी पॉवर आणि 190 एनएम टॉर्क जेनरेट करते.  दोन्ही इंजिन स्टँडर्ड 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन अथवा 5-स्पीड AMY ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसोबत येईल. याशिवाय तीन सिलेंडर 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देखील देण्यात आलेले आहे. जे 99 एचपी पॉवर 172 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच सीएनजी पर्यायासह 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे.

(Source)

कारच्या इंटेरिअरबद्दल सांगायचे तर यात ग्रँड आय10 आय प्रमाणेच इंटिरिअर देण्यात आलेले आहे. सेंटरमध्ये 8 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम मिळेल. जे अॅपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटो सपोर्ट असेल. यामध्ये Arkamys प्रिमियम साउंड सिस्टम सेटअप, इको कोटिंग आणि एअर कर्टन मिळेल. चालकाच्या बाजूला 5.3 इंच स्पीडोमीटर आणि एमआयडीसोबत वायरलेस चार्जिंग फीचर देखील मिळेल.

(Source)

ह्युंडाई ऑरामध्ये प्रोजेक्टर हेडलँम्प, फॉग लाईट्स, फ्रंट ग्रिलच्या कोपऱ्यावर ट्विन डीआरएल मिळेल. याशिवाय 15 इंच डायमंड कट एलॉय व्हिल्स देण्यात आलेले आहेत. टेललॅम्पस एलईडी सेटअपसोबत झेड आकाराचे आहेत. या कारमध्ये 402 लीटर बूट स्पेस मिळेल, जे इतर गाड्यांमध्ये सहसा मिळत नाही.

या गाडीच्या किंमतीबद्दल अद्याप खुलासा झालेला नसला तरी गाडीची किंमत 5.50 लाख ते 9 लाख रुपयांमध्ये असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment