विद्यार्थी आणि बेरोजगारांना देखील अशाप्रकारे मिळू शकते क्रेडिट कार्ड

(Source)

क्रेडिट कार्डची आज गरज अनेकांना भासत असते. मात्र विद्यार्थी आणि बेरोजगारांना क्रेडिट कार्ड मिळणे अवघड असते. याशिवाय नवनवीन कर्मचारी ज्यांची कोणतीही क्रेडिट कार्ड नसते त्यांना देखील लवकर क्रेडिट कार्ड मिळत नाही. मात्र या गरजूंना देखील क्रेडिट कार्ड मिळू शकते. त्याविषयी जाणून घेऊया.

दुसऱ्या स्रोतातून उत्पन्न –

बँक एखाद्या क्रेडिट कार्ड देण्याआधी ती व्यक्ती क्रेडिट कार्डचे पैसे परत करण्यास सक्षम आहे का हे पाहते. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेऊ इच्छिणाऱ्या उत्पन्नाचा स्त्रोत असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमच्या काम नसताना देखील कमाईचा एखादा स्त्रोत असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकते. उत्पन्नाचा स्त्रोत एफडी, आरडी, ट्रस्ट मनी, भाडे इत्यादी गोष्टी असू शकतात.

एफडीवर देखील मिळते क्रेडिट कार्ड –

अनेक बँका एफडीवर क्रेडिट कार्ड देतात. बँका ज्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड हवे आहे अशांना बँकेत एफडी करण्याची देखील ऑफर देते. ज्यांच्याकडे निश्चित अशी नोकरी नाही ते एफडीद्वारे क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात.

विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट कार्ड –

विद्यार्थी देखील क्रेडिट कार्ड घेऊ शकतात. अनेक बँका विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड देतात. मात्र या कार्डांचे लिमिट सर्वसाधारण कार्डच्या तुलनेत कमी असते. विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट कार्डसाठी कमी व्याज, ज्वाइनिंग आणि रिन्यूअल फीमध्ये देखील सूट दिली जाते.

अॅड-ऑन कार्ड –

अॅड ऑन हे एक एडिशनल कार्ड आहे. जे प्रायमेरी क्रेडिट कार्ड अंतर्गत जारी करण्यात येते. हे सर्वसाधारणपणे प्रायमेरी कार्डधारकांच्या नातेवाईकांना, 18 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना दिले जाते. जर कोणी बेरोजगार असेल व त्याच्या कुटूंबातील सदस्याकडे प्रायमेरी कार्ड असेल तर ती व्यक्ती अॅड-ऑन कार्डाचा लाभ घेऊ शकते.

Leave a Comment