… म्हणून या व्यक्तीने 36 कुटूंबांचे विजेचे बिल स्वतः भरले

(Source)

अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे राहणाऱ्या मायकल एस्मंड सध्या चर्चेत आहेत. याला कारण देखील तसे खास आहे. पैशाच्या कमतरतेमुळे कोणाचाही ख्रिसमस सण वाईट जावू नये यासाठी मायकल यांनी 36 कुटूंबाचे विजेचे बिल स्वतःच भरले आहे.

मायकल यांना काही दिवसांपुर्वी विजेचे बिल आले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, 1980 च्या दशकात एकदा बिल न भरल्यामुळे त्यांच्या घराची गॅस पाईपलाईन बंद करण्यात आली होती. त्यांना हिवाळ्या विना हीटिंगशिवाय राहावे लागले होते.

मायकल म्हणाले की, जेव्हा मला बिल मिळाले तेव्हा जुनी गोष्ट आठवली. याच कारणामुळे कोणाचाही सण पैशांच्या कमतरतेमुळे खराब होऊ नये. मायकल यांनी 36 कुटूंबाचे विजेचे बिल भरण्यासाठी 4600 डॉलर (जवळपास सव्वा तीन लाख रुपये) खर्च केले.

मायकल फ्लोरिडाच्या गल्फ ब्रीज शहरात पूल आणि स्पा चालवतात. 61 वर्ग किमीच्या या छोट्या शहराची लोकसंख्या 6 हजार आहे. मायकल यांच्या कृत्यासाठी सर्वजण फोन करून त्यांचे कौतूक करत आहेत.

Leave a Comment