या प्रकारच्या कॉफीमुळे मधुमेहाचा धोका होतो कमी

(Source)

कॉफी पिणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. एका अभ्यासात संशोधकांनी दावा केला आहे की, फिल्टर कॉफीमुळे मधुमेह टाइप 2 चा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. फिल्टर कॉफी म्हणजेच कॉफीला पाणी अथवा दुधात टाकून न उकळता, आधी कॉफीला कपमध्ये टाकून त्यात गरम पाणी अथवा दूध टाकणे.

हा शोध इंटर्नल मेडिसिन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, फिल्टर कॉफी पिल्याने आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. स्वीडनच्या चलमर्स युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी आणि उमिया युनिवर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात फिल्टर कॉफीविषयी अनेक नवीन माहिती समोर येते. याचबरोबर यामुळे कॉफीच्या प्रकारांद्वारे होणारा परिणाम देखील समोर येतात.

उमिया युनिवर्सिटीचे प्रोफेसर आणि या अभ्यासाचे संशोधक रिकॉर्ड लँडबर्ग सांगतात की, आम्हाला शरीरात विशिष्ट अणू सापडले. जे कॉफीच्या विविध प्रकाराच्या सेवनाचे संकेत देतात. आपल्या रक्तात हे अणू बायोमार्कर रुपात आहेत. याचा सामन्यता वापर टाइप 2 मधुमेहाच्या धोक्याचे विश्लेषण करताना केला जातो.

ते म्हणाले की, टाइप 2 मधुमेहाशी संबंधित परिणाम स्पष्टपणे दर्शवतात की शरीरावर याचे सकारात्मक परिणाम होतात आणि मधुमेहाला विकसित होण्यापासून रोखते.

संशोधकांनुसार, जे दिवसातून 2 ते 3 वेळा फिल्टर कॉफीचे सेवन करतात, त्यांच्यामध्ये टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत 60 टक्के कमी असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment