कितीही काही करा फेसबुकला कळते तुमचे अचुक ठिकाण


वॉशिंग्टन – फेसबुक वापरकर्त्याने आपल्या ठिकाणाचा (लोकेशेन) पर्याय बंद केला तरी त्याची माहिती मिळते अशी स्पष्ट कबुली फेसबुकने दिली आहे. फेसबुक गोपनीयतेच्या (प्रायव्हसी) वरिष्ठ अधिकाऱ्याने तशा आशयाचे पत्र अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीला लिहिले आहे.

अमेरिकेचे लोकप्रतिनिधी जॉश हॉले आणि ख्रिस्तोफर ए. कून्स यांना फेसबुक गोपनयीता (प्रायव्हसी) उपप्रमुख रॉब शेरमॅन यांनी लिहिलेले पत्र ट्विटरवर व्हायरल झाले आहे. सोशल मीडियातील आघाडीची कंपनी वापरकर्त्याचे ठिकाण कसे ट्रॅक करते याची माहिती यामध्ये शेरमॅन यांनी दिली आहे.


ठिकाणाची माहिती देण्याचा पर्याय वापरकर्त्याने बंद केला तरी माहिती मिळते. हे जाहिराती दर्शविण्यासाठी करण्यात येते. तिथे कोणताही पर्याय नाही. तुमचे तुमच्या वैयक्तिक माहितीवर नियंत्रण नाही. ही मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे. त्यावर काँग्रेसने कारवाई करायला पाहिजे, असे ट्विट लोकप्रतिनिधी जॉश हॉले यांनी केले आहे. लोकप्रतिनिधींनी गेल्याच महिन्यात वापरकर्त्याचे ठिकाण खासगी ठेवत त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा, असे म्हटले होते.

जर तुम्ही कुठे एखाद्या कार्यक्रमाला गेले असताना ठिकाणाचा दुवा असलेला फोटो अपलोड केल्यानंतर फेसबुकला ही माहिती समजते. तसेच फेसबुकला तुमच्या मित्राला टॅग केल्यानंतरही ठिकाणाची माहिती कळते. गोपनीयतेवर नियंत्रण ठेवण्याची सुविधा देणारे अँड्राईड अ‌ॅप फेसबुकने फेब्रुवारीमध्ये लाँच केले. वापरकर्त्याची माहिती आणि ठिकाण याची माहिती न देण्याचा यामध्ये पर्याय आहे. पण वापरकर्ता याच्या माध्यमातून फेसबुकचा वापर करत नसतानाच लोकेशनची माहिती गुप्त ठेवता येते. फेसबुकचा वापर सुरू केल्यानंतर तुमचे लोकेशन आपोआप फेसबुकला समजते.

Leave a Comment