शाओमीने लाँच केले असे सीट जे अपघातात देखील वाचवेल बाळाचे प्राण

(Source)

प्रवासात गाडीमध्ये बाळांना आरामदायी आणि सुरक्षितता देण्यासाठी टेक कंपनी शाओमीने 360 डिग्री फिरणारी QBORN 360° रोटेटिंग बेबी सीट लाँच केली आहे. ही सीट शाओमीच्या क्राउडफंडिग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या सीटची किंमत जवळपास 14 हजार आहे.

या सीटचे वैशिष्ट्य म्हणजे याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनच्या गाइडलाईननुसार बनविण्यात आले आहे. याला चीन आणि यूरोपियन यूनियचे आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. हे सीट 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी वापरता येऊ शकते.

(Source)

या सीटमध्ये कंपनी सिल्क आणि छोटा आकार दिला असून, हे सीट 360 डिग्री फिरते. हे फीचर वापरण्यासाठी पुढील बाजूला दोन बटन देखील देण्यात आलेले आहेत.

या सीटमध्ये मोल्डेड प्लास्टिकच्या डबल लेअरचा वापर करण्यात आलेला आहे. याच्या आतील बाजूस हाय डेंसिटी स्पॉन्ज लावण्यात आलेले आहे, जे जोरदार धक्का सहन करण्यास सक्षम आहेत.

या सीटमध्ये चार लेअर कूशनिंग मटेरियलचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे बाळाच्या मानेला आराम मिळतो. सध्या हे सीट केवळ चीनमध्ये विकले जात असून, 9 जानेवारीपासून याची विक्री सुरू होईल.

 

Leave a Comment