उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदाराला जन्मठेपेची शिक्षा


नवी दिल्ली – भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरला उन्नाव बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयाने सुनावली आहे. न्यायालयाने यावेळी कुलदीप सिंह सेंगरला पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे.

संपूर्ण देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगरला न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी दोषी ठरवले होते. दरम्यान न्यायालयाने १९ डिसेंबरला शिक्षेवर सुनावणी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आज न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Leave a Comment