ह्युंदाई इलेक्ट्रिक कोना मिशन इम्पॉसिबलसाठी सज्ज


अल्पावधीत कार शौकीनांच्या पसंतीस उतरलेली ह्युंदाईची इलेक्ट्रिक एसयुवी कोना सध्या मिशन इम्पॉसिबलची तयारी करत आहे. कोना जगातील सर्वोच्च उंचीचे शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस्ट कॅम्पपर्यंत पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयुवी अशी तिची ओळख बनविण्याच्या प्रयत्नात आहे.

तिबेटची राजधानी ल्हासा येथून कोना एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा प्रवास करणार आहे. याचवर्षी जुलै मध्ये ही कार भारतीय बाजारात सादर केली गेली आहे. तिची बेस प्राईज २३.८६ लाखापासून आहे. भारतात या इलेक्ट्रिक एसयूव्हीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

कोनाला ३९.२ केडब्ल्यूएच लिथियम आयन बॅटरी दिली गेली असून सीसीएस टाईप टू चार्जिंग पोर्ट दिले गेले आहे. त्यावर ही एसयुव्ही ५७ मिनिटात ८० टक्के चार्ज होते. ही कार घर, ऑफिसमध्ये सुद्धा चार्ज करता येते. तिला पोर्टेबल चार्जिंग ऑप्शनही दिला गेला आहे. सिंगल चार्ज मध्ये ती ४५२ किमी अंतर कापते आणि ० ते १०० किमीचा वेग ९.७ सेकंदात घेऊ शकते. कार पूर्ण चार्ज करण्यासाठी ६ तास लागतात आणि चार्जिंग पोर्ट ग्रीलच्या आतच दिले गेले आहे.पोर्टेबल चार्जिंग पोर्ट २.८ केडब्ल्यूएचचे असून रेग्युलर सॉकेटमध्ये कनेक्ट करता येते.

Leave a Comment